मुस्लिम चालकामुळे कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 07:32 AM2018-04-23T07:32:12+5:302018-04-23T07:32:12+5:30

मुस्लिम चालक असल्याने ओला कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने चांगलंच सुनावलं आहे.

cancelled ola cab for muslim driver, ola says as statement we are secular as our country | मुस्लिम चालकामुळे कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने सुनावलं

मुस्लिम चालकामुळे कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने सुनावलं

Next

लखनऊ- मुस्लिम चालक असल्याने ओला कॅब रद्द करणाऱ्या प्रवाशाला ओलाने चांगलंच सुनावलं आहे. आम्ही आमच्या चालक आणि प्रवाशांसोबत कुठल्याही जाती, धर्म, लिंग किंवा पंथाच्या आधारे भेदभाव करत नाही’, असं कॅब सेवा देणाऱ्या ओला कंपनीने स्पष्ट केलं आहे. 

अभिषेक नावाच्या एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी ओला कॅब रद्द केली होती. कॅब बूक केल्यानंतर त्या कॅबचा ड्रायव्हर मुस्लिम असल्याने त्याने कॅबचं बुकिंग रद्द केलं. अभिषेकने कॅब रद्द केल्यानंतर अॅपवरील स्क्रीनशॉट काढून तो ट्विटरवर पोस्ट केला. ‘मला माझे पैसे अशा जिहादींना देण्याची इच्छा नाही’, असं अभिषेकने स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शन दिलं. अभिषेकचं हे ट्विट काही मिनिटातच व्हायरल झालं. ओला कंपनीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लगेचच अभिषेकच्या ट्विटला उत्तर दिलं. ‘आपल्या देशाप्रमाणे ओलाही एक धर्मनिरपेक्ष व्यासपीठ आहे. आम्ही आमच्या चालक, प्रवाशी यांच्यामध्ये जाती, धर्म, लिंग किंवा पंथ यांच्या आधाराव भेदभाव करत नाही. आमच्या सर्व ग्राहकांना आणि चालकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी एकमेकांशी सन्मानाने वागावं, अशं ट्विट ओला कंपनीने करत त्या प्रवाशाला उत्तर दिलं. 

अभिषेकने हे ट्विट बंगळुरूच्या रश्मी नायर नावाच्या मुलीच्या फेसबुक पोस्टला उत्तर देण्यासाठी केलं होतं. रश्मीने भगवान हनुमानाचं पोस्टर लावलेल्या कॅबमधून प्रवास न करण्याबाबत लिहीलं होते. 'मी बलात्कारी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बलात्काऱ्यांचे पोट भरण्यासाठी आपले पैसे देणार नाही', असं ट्विट रश्मीने केलं होतं. त्या ट्विटला उत्तर देण्यासाठी अभिषेकने ओलाच्या विरोधात ट्विट केलं. 

मुस्लिम कॅब चालकामुळे प्रवास रद्द करणारा अभिषेक हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून त्याला ट्विटरवर अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री फॉलो करतात.

Web Title: cancelled ola cab for muslim driver, ola says as statement we are secular as our country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.