टोकदार दातांमुळेही होतो कॅन्सर
By Admin | Published: February 12, 2017 08:54 AM2017-02-12T08:54:33+5:302017-02-12T08:54:33+5:30
तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू, गुटखा, पान मसाला यांनी होतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण दात खराब झाल्यामुळेही तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते,
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 12 - तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू, गुटखा, पान मसाला यांनी होतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण दात खराब झाल्यामुळेही तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये वाकडेतिकडे झालेले दात किंवा टोकदार दात तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
याबाबतचे वृत्त नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. तोंडाचा कॅन्सर हा अनुवांशिकतेमुळे तसेच खराब दातांमुळेही होऊ शकतो. अनेकवेळा अपघातामुळे दात वाकडे होतात. तसेच अनेकदा टोकदार दात गाल आणि दाढांना लागून जखमात होतात. अशा जखमांवर वेळीच इलाज न केल्यास त्या जखमा तोंडाच्या कर्करोगाचे रूप घेऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
तंबाखूमुळे होणारा कॅन्सर आणि टोकदार दातांमुळे होणाऱ्या कॅन्सरची लक्षणे एकसारखीच असतात. असेही डॉक्टरांनी सांगितले. सामान्यपणे अशा अवस्थेत गालांच्या जवळ लालसरपणा, तोंडामध्ये पांढरेपणा तसेच तोंड कमी उघडणे, गालांच्या पेशी योग्य प्रकारे काम न करणे अशी लक्षणे दिसून येतात.