वयाच्या ५३ वर्षी आईचं जडलं प्रेम, दुसऱ्यांदा केलं लग्न; भावूक झालेल्या मुलानं शेअर केला फोटो अन् सांगितली आईच्या जिद्दीची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:47 PM2022-03-03T19:47:12+5:302022-03-03T19:48:12+5:30

Son Emotional post on Mother Remarriage: एका मुलानं आपल्या ५३ वर्षीय आईसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महिलेनं वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्या पतीला २०१३ साली गमावलं होतं.

cancer survivor woman second marriage son wrote emotional post | वयाच्या ५३ वर्षी आईचं जडलं प्रेम, दुसऱ्यांदा केलं लग्न; भावूक झालेल्या मुलानं शेअर केला फोटो अन् सांगितली आईच्या जिद्दीची कहाणी...

वयाच्या ५३ वर्षी आईचं जडलं प्रेम, दुसऱ्यांदा केलं लग्न; भावूक झालेल्या मुलानं शेअर केला फोटो अन् सांगितली आईच्या जिद्दीची कहाणी...

Next

Son Emotional post on Mother Remarriage: एका मुलानं आपल्या ५३ वर्षीय आईसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महिलेनं वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्या पतीला २०१३ साली गमावलं होतं. त्यानंतर तिला कॅन्सर आणि कोरोनाचीही लागण झाली होती. मुलगा परदेशात राहत होता आणि ती भारतात एकटी पडली होती. असंख्य अडचणींचा सामना केल्यानंतर महिलेनं जिद्द सोडली नाही. गेल्या वर्षी याच महिलेचं एका व्यक्तीवर प्रेम जडलं आणि लग्नही केलं. 

जिमीत गांधी नावाच्या तरुणाच्या आईची ही प्रेरणादायी कहाणी आहे. त्यानं आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या आईसाठी भावूक पोस्ट लिहीली आहे. त्यानं आपल्या आईचा उल्लेख 'फायटर' आणि 'वॉरियर' असा केला आहे. जिमीतच्या आईनं कॅन्सर आणि डिप्रेशनसारख्या आजारांचा मोठ्या हिमतीचं समाना केला आहे. जिमीतनं लिंक्डिनवर एक भावूक पोस्ट शेअर करत संपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याच्या पोस्टवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. Linkedin प्रोफाइलवरील माहितीनुसार जिमीत गांधी Refinitive नावाच्या कंपनीत Sales and Account Management पदावर कार्यरत असून तो दुबईत स्थायिक आहे. 

पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"तिनं २०१३ साली आपल्या पतीला गमावलं. त्यावेळी आईचं वय ४४ वर्ष होतं. २०१९ साली तिला स्टेज-३ ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यानंतर दोन वर्ष तिनं केमोथेरेपी घेतली. कॅन्सरवरही तिनं मात केली. कॅन्सरवर उपचार घेत असताना तिला कोरोनाची लागण झाली. यात ती नैराश्यात गेली. नैराश्य आणि कोरोना या दोघांचा तिनं सामना केला. पण हार अजिबात मानली नाही. वयाच्या ५२ व्या वर्षी ती पुन्हा एकदा प्रेमात पडली. तिनं लग्न केलं. ती एक फायटर आहे आणि माझी आई आहे", असं जिमीत गांधीनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

१४ फेब्रुवारीला केलं लग्न
जिमीननं आपल्या पोस्टमध्ये पुढे असंही म्हटलं की माझ्या पीढीतील जितके लोक आहेत आणि त्यांचे आई-वडील सिंगल असतील तर त्यांची मदत करा. जर ते एखाद्या साथीदाराची निवड करत असतील तर त्यांना पाठिंबा द्या आणि कोणत्याही प्रकारचा संकोच मनात बाळगू नका. जिमीतनं सांगितलं की, त्याच्या आईनं सुरुवातीला तिच्या रिलेशनशीपबाबत सांगण्यास संकोच बाळगला होता. पण ही गोष्ट आईनं माझ्या पत्नीला सांगितली. त्यानंतर पुढील गोष्टी अधिक सोप्या होत गेल्या आणि आईनं १४ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. 

Web Title: cancer survivor woman second marriage son wrote emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.