वेल्लोरची निवडणूक रद्द; उमेदवाराची कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:04 PM2019-04-17T12:04:47+5:302019-04-17T12:06:11+5:30

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात AIADMKचे सहयोगी आणि वेल्लोर मतदार संघाचे उमेदावर ए.सी. षण्मुगन यांनी बुधावारी मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे.   

candidate AC Shanmugam to move Madras High Court today against EC's decision to cancel Vellore Lok Sabha polls | वेल्लोरची निवडणूक रद्द; उमेदवाराची कोर्टात धाव

वेल्लोरची निवडणूक रद्द; उमेदवाराची कोर्टात धाव

Next

चेन्नई : वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले. या कारवाईसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीला राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात AIADMKचे सहयोगी आणि वेल्लोर मतदार संघाचे उमेदावर ए.सी. षण्मुगन यांनी बुधावारी मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे.   

मोठ्या प्रमाणात अनधिकृत रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू, सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मोफत भेटवस्तूंचे आमिष येथील मतदारांना दाखविण्यात येत असल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला मिळाला होता. आतापर्यंत जप्त केलेल्या 2250 कोटींच्या अनधिकृत रोख रक्कमेपैकी केवळ तामिळनाडूतून 494 कोटी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.  निवडणूक आयोगाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे वेल्लोरमधील मतदान रद्द करण्याची शिफारस केली होती.


दरम्यान, द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खजिनदार दुराईमुरुगन यांचे पुत्र कतीर आनंद यांना पक्षाने वेल्लोर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. 29 मार्च रोजी कतीर यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रोकड सापडली होती. त्यानंतर 29 आणि 30 मार्चच्या रात्री दुराईमुरुगन यांच्या मालकीच्या किंगस्टन कॉलेजमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सिमेंट गोदामात हलवण्यात आल्याची खबर मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने 1 एप्रिल रोजी टाकलेल्या छाप्यात 11.53 कोटींची बेहिशेबी रोख रक्कम या गोदामात सापडली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने दिलेल्या अहवालावरून 10 एप्रिल रोजी जिल्हा पोलिसांनी कतीर आनंद तसेच द्रमुकच्या अन्य दोन नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली.
 

Web Title: candidate AC Shanmugam to move Madras High Court today against EC's decision to cancel Vellore Lok Sabha polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.