प्रचार करताना उमेदवाराचा झाला मृत्यू
By admin | Published: February 12, 2017 09:56 PM2017-02-12T21:56:55+5:302017-02-12T21:56:55+5:30
चंद्रशेखर कन्नोजिया हे देखील आपल्या मतदार संघात प्रचारासाठी बाहेर पडले होते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मतदानाची तारीख जशी जवळ येतं आहे तसे उमेदवार आपला प्रचार जोरत आणि जीव झोकून करताना पाहायला मिळत आहे. आज उत्तरप्रदेशमध्ये एक दुख:द घटना घडली आहे.
समाजवादी पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कन्नोजिया यांचं प्रचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमधील अलापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार होते. आंबेडकरनगरसह 11 जिल्ह्यांमध्ये 52 जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
चंद्रशेखर कन्नोजिया हे देखील आपल्या मतदार संघात प्रचारासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी प्रचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला