उमेदवार लादणार नाही : भाई जगताप

By admin | Published: August 24, 2016 11:17 PM2016-08-24T23:17:15+5:302016-08-24T23:24:52+5:30

कॉँग्रेस बैठक : जिल्हा परिषद- पंचायत समित्यांसाठी कार्यकर्त्याला महत्त्व

Candidate will not impose: Bhai Jagtap | उमेदवार लादणार नाही : भाई जगताप

उमेदवार लादणार नाही : भाई जगताप

Next

कॉँग्रेस बैठक : जिल्हा परिषद- पंचायत समित्यांसाठी कार्यकर्त्याला महत्त्व
नाशिक : येत्या जानेवारी-फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणार्‍या कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच उमेदवारी दिली जाईल. कोणताही उमेदवार स्थानिकांवर लादला जाणार नाही, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार भाई जगताप यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या आढावा बैठकीत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कॉँग्रेस भवनात आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, निवृत्ती डावरे, श्याम तायडे, भाऊसाहेब बोरस्ते, सुनील आव्हाड, भास्करराव बनकर आदि उपस्थित होते. आमदार भाई जगताप यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या घटनेतील बदलानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय प्रदेश कॉँग्रेसने घेतला. जिल्‘ातील १५ मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून, ते ते निरीक्षक त्या त्या मतदारसंघात किमान दहा दिवस राहतील. त्यांच्या कामकाजावर पक्षाची करडी नजर राहील. निरीक्षकांनी त्या त्या तालुक्यात बूथ कमिट्यांपासून काम उभे करायचे आहे. पक्षाचे उमेदवारदेखील नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय पॅनलकडून अंतिम केले जातील. पक्षाकडून त्या त्या मतदारसंघात कोणताही उमेदवार वरून लादला जाणार नाही. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी राष्ट्रवादीने पक्षाचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र आगामी निवडणुकांमध्ये युतीला शह देण्यासाठी काही ठिकाणी आघाडी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निर्मला खर्डे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इन्फो..
अनेकांनी फिरविली पाठ
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला जाणार असल्याचे माहीत असूनही अनेक आजी-माजी आमदार-खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरविली. तसेच जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांपैकी एकट्या अनिल पाटील यांनी हजेरी लावली. सभेची गर्दी पाहून ही गर्दी वाढली पाहिजे, असे आमदार भाई जगताप यांना सांगावे लागले.
फोटो कॅप्शन-
२४ पीएचअेयू-६१ - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार भाई जगताप. समवेत कॉँग्रेसचे पदाधिकारी.

Web Title: Candidate will not impose: Bhai Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.