उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

By admin | Published: February 15, 2017 09:03 PM2017-02-15T21:03:39+5:302017-02-15T21:03:39+5:30

उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

Candidates waiting for party funds, Rakau hands: BJP, Shiv Sena expectations | उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

Next


अमरावती : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात प्रमुख पक्षांचे तिकिट घेऊन उतरलेल्या अधिकृत उमेदवारांना आता पार्टी ‘फंड’ चे वेध लागले आहे. त्यासाठी पक्षाच्या नेते-प्रमुखांकडे वारंवार विचारणा केली जात आहे. त्यातही सत्तेत असल्याने भाजपा व शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांना अधिक अपेक्षा आहेत.
कोणत्याही निवडणुका म्हटल्या की आधी पैशाचा मुद्दा येतो. निवडणूक खर्चिक झाल्याचे पाहून कोणताही पक्ष इच्छुकांना तुझी अश्वशक्ती किती हा पहिला प्रश्न केला जातो. उमेदवारी मागणाराही आपल्यातील प्लस पॉर्इंट सांगताना पहिल्यांदा अश्वशक्तीच किती ते सांगतो. कार्यकर्ता कितीही निष्ठावान, प्रामाणिक व लोकप्रिय असेल आणि त्यांची अश्वशक्ती नसेल तर त्याला तिकिट नाकारले जाते.त्याचवेळी अन्य गुण नसताना केवळ अश्वशक्तीच्या बळावर खेचून आणल्याचीही उदारणे आहेत. परंतु सर्वच उमेदवारांसाठी अश्वशक्ती हा निकष लागू होत नाही. मग अशा उमेदवारांना पार्टी ‘फंड’ ची अपेक्षा असते. जिल्हा परिषद व पंचायत सतिमीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नजरा सध्या पार्टी फंड वर लागलेल्या आहेत. कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नाही आणि नेते मंडळी खिशात हात घालण्यास तयार नसल्याने उमेदवारांना फार काही अपेक्षा नाहीत.
नेत्यांनी पार्टी फंड बाबत तसेही हात वर केलेच आहे.खरा प्रश्न आहे तो सत्तेत असलेल्या भाजपाचे राज्यमंत्री व आमदार आहेत. त्यामुळे या नेत्याकडे पक्षाचे उमेदवार पार्टी फंडसाठी मोठया अपेक्षेने पाहत आहेत. सेनेचा एकही आमदार नाही. खासदारांवर खरी भिस्त आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना मिळेल त्या पार्टी फंडवर समाधान मानावे लागणार आहे. आता नेते या उमेदवारांना किती लाभ देतात यावर निवडणुकीतील जय- पराजयाचे गणित गणित अवलंबून आहे.(प्रतिनिधी)
पैशाशिवाय कार्यकर्ता पाय पुढे सरकवत नाही
पूर्वी घरच्या भाकरी बांधून कार्यकर्ते प्रचार करायचे, त्या निवडणुकांमध्ये पैसा हा विषय गौण होता. परंतु आता दिवस पालटले आहेत. पैशाशिवाय कार्यकर्ता पाय पुढे सरकवत नाही. एकदा निवडून आल्यावर नेता आपली किमान पाच वर्षाची सोय लावतो.याची जाणीव झाल्याने कार्यकर्र्ते हूशार झाले आहेत. निवडणूकीकडे संधी म्हणून कार्यकर्र्ते पाहत आहेत. प्रचारासाठी वातानुकुलीत गाडी, चहा-पानाचा खर्च, दुपारचे जेवण आणि रात्रीची सोय एवढया किमान अटी कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातही उमेदवाराचा प्रचार करतील याची हमी नाही. अनेकदा प्रचारासाठीच्या गाडया ढाब्यावर तासनतास आराम करतात.

Web Title: Candidates waiting for party funds, Rakau hands: BJP, Shiv Sena expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.