चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास उमेदवारी होणार रद्द - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: November 2, 2016 11:31 AM2016-11-02T11:31:50+5:302016-11-02T12:02:08+5:30

उमेदवाराने निवडणूक लढवताना शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे

The candidature will not be canceled if the wrong educational information is given - the Supreme Court | चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास उमेदवारी होणार रद्द - सर्वोच्च न्यायालय

चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास उमेदवारी होणार रद्द - सर्वोच्च न्यायालय

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - निवडणूक लढवताना शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. निवडणूक लढणा-या उमेदवाराची योग्य शैक्षणिक माहिती मिळणे मतदारांचा मुलभूत अधिकार आहे, आणि जर उमेदवाराने अर्जात चुकीची माहिती दिली असेल तर निवडणूक रद्द केली जाऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढवताना योग्य माहिती न दिल्यास उमेदवारी जाण्याची टांगती तलवार उमेदवारांवर असणार आहे. 
 
मणिपूरमधील काँग्रेस आमदार मैरीमबेम पृथ्वीराज यांनी आपल्या उमेदवारी अर्जात एमबीए शिक्षण घेतल्याची खोटी माहिती दिली होती. यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत मतदारांना उमेदवारांसंबधी पुर्ण आणि योग्य माहिती मिळत नसेल तर मतदान हक्काचा काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मैरीमबेम पृथ्वीराज यांची आमदारकी रद्द केली आहे. 
 
'निवडणूक लढणा-या उमेदवाराची माहिती सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभुमी असेल तर त्याला मत द्यायचं की नाही हा निर्णय तो घेऊ शकतो. शैश्रणिक पात्रता आणि संपत्ती पाहता निवडणूक लढवण्यास उमेदवार योग्य आहे की नाही हेदेखील मतदार ठरवू शकतात', असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे. 
 
काँग्रेस आमदाराने मात्र ही कारकुनी त्रुटी असल्याचा दावा केला, मात्र न्यायालयाने याचा परिणाम निवडणुकीवर झाला असल्याचं सांगत आमदारकी रद्द केली आहे. काँग्रेस आमदाराने 2008 विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे चुकीची माहिती दिल्याच आल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. 
 

Web Title: The candidature will not be canceled if the wrong educational information is given - the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.