Inflation: मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:35 AM2022-08-30T11:35:57+5:302022-08-30T11:38:09+5:30

Inflation: गेल्या काही वर्षांपासून मसाल्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या केवळ दोन वर्षांमध्ये मसाल्यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, तांदूळ ३२ टक्के महाग झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना मसल्याची फोडणी देणे महागले आहे.

Can't even afford to give a splash of spice! 30% increase in price; Rice, soap expensive | Inflation: मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग

Inflation: मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून मसाल्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या केवळ दोन वर्षांमध्ये मसाल्यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, तांदूळ ३२ टक्के महाग झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना मसल्याची फोडणी देणे महागले आहे.
भारत अफगाणिस्तानव्यतिरिक्त इराण, तजाकिस्तान व इतर देशांतून हिंग आयात करतो. मात्र पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने 
हिंगाच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर मसाल्यांची किंमतही दुप्पट वाढली आहे. गरम मसालादेखील १५५.६ टक्क्यांनी महाग झाला आहे.

स्वस्त काहीच राहिले नाही
मसाल्यांसोबतच इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी पॅकचा आकार कमी केला आहे. याचवेळी ब्रिज पॅक्स तयार केले असून, ग्राहकांना मोठे पॅक घेण्याकडे वळवले जात आहे. 

दुधाच्या किमतीत ५.४ टक्के तर ब्रेड १२.३ टक्के महाग झाला आहे. लोणी, तूप, बासमती तांदूळ यांचे भावही वाढले आहेत. आज बाजारातील प्रत्येक वस्तू, भाजीपालाही घेतानाही सामान्य नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. 

काय किती महाग दाेन वर्षांत? 
मसाले
मिरची पावडर     १२.२०% 
हळद     ११.६०% 
जिरे     १२.७०% 
गरम मसाला     १५.६०% 
हिंग     १२.२०% 

इतर वस्तू
परफ्यूम     ६.७०% 
हेअर कलर     ७.१०% 
शॅम्पू     ८.३०% 

रोजची उत्पादने
बटर     ७.७०% 
तूप     ५.३०% 
बासमती तांदूळ     ३२% 
आंघोळीचा साबण     १५% 
साबण     ९.७०% 
दूध     ५.४०% 
गव्हाचे पीठ     ८% 
मैदा     ९.७०% 
ब्रेड     १२.३०%

 

Web Title: Can't even afford to give a splash of spice! 30% increase in price; Rice, soap expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.