‘प्रलंबित याचिकेचा वापर मल्ल्या करू शकत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 04:48 AM2020-01-07T04:48:39+5:302020-01-07T04:48:42+5:30
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा वापर इतर न्यायालयांनी सुरू केलेल्या दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेला थांबवण्यासाठी करू शकत नाही,
नवी दिल्ली : उद्योजक विजय मल्ल्या हा त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा वापर इतर न्यायालयांनी सुरू केलेल्या दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेला थांबवण्यासाठी करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला केंद्र सरकारने सांगितले की, विजय मल्ल्या हा इंग्लंडमधील न्यायालयातून त्याच्याविरोधातील दिवाळखोरीच्या प्रक्रियेचा निवाडा थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या त्याच्या याचिकेचा वापर करीत आहे. विजय मल्ल्याच्या मालकीची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला स्थगित केले जावे म्हणून गेल्या वर्षी २७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्यावर नऊ हजार कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज न फेडल्याचा आरोप ठेवलेला आहे,