का झाली खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या? पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 11:32 PM2023-09-19T23:32:51+5:302023-09-19T23:33:48+5:30
"एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने, कसल्याही प्रकारचा पुरावा नसताना, केवळ मतांसाठी, अशा प्रकारची वक्यव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे."
खलिस्तानी कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यांचा हा दावा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी फेटाळला. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, ही हत्या कॅनडातील गुरु नानक शिख गुरुद्वारा आणि सर्रे व्यवस्थापनातील गटबाजीचा परिणाम आहे.
अमरिंदर सिंग म्हणाले, ट्रूडो हे दुर्दैवाने व्होट बँकेच्या राजकारणात अडकले आहेत आणि त्यांनी भारत-कॅनडाचे राजनैतिक संबंध पणाला लावले आहेत. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने, कसल्याही प्रकारचा पुरावा नसताना, केवळ मतांसाठी, अशा प्रकारची वक्यव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे.
The claims by the Canadian PM @JustinTrudeau that there was an Indian hand in the murder of Hardeep Singh Nijjer are completely baseless and he's only playing to the vote bank gallery.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 19, 2023
During his visit to Amritsar in 2018, I had brought to the notice of Mr Justin Trudeau as to…
एका हॉटेलमध्ये भेटले होते ट्रूडो आणि कॅप्टन -
कॅप्टन म्हणाले, कॅनडाच्या जमिनीचा वापर भारता विरोधात कशा प्रकारे होत आहे, हे आपण ट्रुडो यांच्या निदर्शनास आणून दिले होते. ते म्हणाले, 2018 मध्ये आपण अमृतसरमधील एका हॉटेलमध्ये ट्रूडो यांना भेटलो होते. तेव्हा आपण त्यांच्यासोबत बरीच माहिती शेअर केली होती. मात्र, कॅनाडा सरकारने कुठल्याही प्रकारे सुधारात्मक पावले उचलण्या ऐवजी, त्या देशात भारत विरोधी कामात वाढ झाली आहे.
अमरिंदर सिंग यांनी कॅनाडाच्या राजनयिकाला निष्कासित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले आहे.