Punjab Election : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली अमित शहांची भेट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:16 PM2022-03-07T17:16:15+5:302022-03-07T17:17:15+5:30
Captain Amarinder Singh : पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही."
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येणार आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वी आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेसचे (Punjab Lok Congress) नेते कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या या भेटीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'अमित शाह यांच्याशी माझी सामान्य चर्चा झाली आहे. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, अमित शहांसोबत पंजाबवर आमची चर्चा झाली आहे, या बैठकीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
याचबरोबर, ज्यावेळी पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही. माझ्या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. बघूया पुढे काय होते ते."
Results not here yet. I had a general discussion with HM, there'll be a detailed discussion once the results come in. It was a general discussion on Punjab, not on elections: Captain Amarinder Singh on his meeting with Union Home Minister Amit Shah in Delhi#PunjabElections2022pic.twitter.com/cWS9tf85qf
— ANI (@ANI) March 7, 2022
पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक
पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक झाली. तर पंजाबमध्ये काँग्रेस आपली सत्ता वाचवण्यासाठी लढत आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. तसेच, सत्ताधारी अकाली दल - भाजप युतीला केवळ 18 जागा जिंकता आल्या होत्या. आम आदमी पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससमोर आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल, बसपा आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस व भाजपाच्या युतीचे मोठे आव्हान आहे.