पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार; पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:31 PM2022-01-23T16:31:56+5:302022-01-23T16:32:22+5:30

Punjab Assemly Election 2022 : उमेदवारांची यादी जाहीर करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला.

Captain Amarinder Singh to contest from Patiala city; Punjab Lok Congress announces list of 22 candidates | पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार; पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर 

पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार; पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर 

googlenewsNext

चंदिगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली. पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार आहेत. 22 उमेदवारांपैकी 2 माढा, 3 दोआबा आणि 17 मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल.

एवढेच नाही तर उमेदवारांची यादी जाहीर करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला.  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना निवडणूक जिंकू देणार नसल्याचे सांगितले. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू पूर्णपणे अक्षम माणूस आहे. तो सर्व वेळ वाया घालवणारा आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष 38 जागांवर निवडणूक लढवत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग पहिल्यांदाच काँग्रेस सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांची भाजपाशी युती आहे. पक्षाने यावेळी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू आणि एका महिलेला तिकीट दिले आहे.

दरम्यान, यंदाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपा आणि शिरोमणी अकाली दल युनायटेडसोबत रिंगणात आहेत. भाजपाने आपले 35 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दल युनायटेडने 14 जागांसाठी उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत.

कोणाला तिकीट कुठून मिळाले?
भटिंडा शहर- राज नंबरदार
भटिंडा ग्रामीण - सवेरा सिंग
भदौर - धरमसिंग फौजी
मालेरकोटला - फरजाना आलम खान
पटियाला ग्रामीण - संजीव शर्मा
पटियाला शहर - कॅप्टन अमरिंदर सिंग
अमृतसर दक्षिण - हरजिंदर सिंग ठेकेदार
फतेहगढ चुडियां - तजिंदर सिंग रंधावा
भुलत्थ - अमनदीपसिंग गोरा गिल
नकोदर - अजित पाल सिंग
नवांशहर - सतबीर सिंग
लुधियाना पूर्व - जगमोहन शर्मा
लुधियाना दक्षिण - संतिंदर पाल सिंग ताजपुरी
आत्मनगर - प्रेम मित्तल
दाखा - दमनजीतसिंग मोही
धरमकोट - रविंदर सिंग ग्रेवाल
समाना - सुरिंदर सिंग खेरकी
सनौर - बिक्रमजीत इंदर सिंग चहल
बुधलाडा - सुभेदार भोला सिंग
रामपुरा फूल - अमरजीत शर्मा
निहाल सिंग वाला - मुखतियार सिंग
खरड - कमलदीप सैनी

Web Title: Captain Amarinder Singh to contest from Patiala city; Punjab Lok Congress announces list of 22 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.