तामिळनाडूत कॅप्टन विजयकांत यांचा सत्ताधारी आघाडीला दे धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:20 AM2021-03-15T01:20:39+5:302021-03-15T01:20:59+5:30
असिफ कुरणे - चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत ...
असिफ कुरणे -
चेन्नई : तामिळनाडूच्याराजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत निवडणुकीआधीच जोराचा धक्का दिला आहे. जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याने डीएमडीकेने हा निर्णय घेतला. तसेच राज्यात अण्णाद्रमुक उमेदवारांच्या पराभवासाठी पक्षाचे कार्यकर्ते काम करतील, असा इशारा डीएमडीकेचे उपसचिव के. एल. सुदीश यांनी दिला आहे. (Captain Vijayakant's push to the ruling front in Tamil Nadu!)
तमिळनाडू निवडणुकीत सत्ताधारी अण्णाद्रमुक व विरोधी द्रमुकला आपल्या मित्रपक्षांना जागा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी पक्षांची संख्या दोन आकडी होत असल्यामुळे प्रत्येकाला त्यांंच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य होईना. त्यामुळे आघाड्यांमध्ये निवडणुकीआधीच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ‘एनडीए’मध्ये प्रमुख अण्णाद्रमुकसह भाजप (२०), पीएमके (२३) यांच्यात जागावाटप निश्चित झाले आहे; पण या दोन पक्षांपेक्षा कमी जागा मिळत असल्याने नाराज झालेल्या विजयकांत यांनी ‘एनडीए’तून फारकत घेतली.
जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज एएमएमकेचे टीटीटी दिनकरन आणि एमआयएमचे औवेसी यांच्यात हातमिळवणी झाली असून, त्यापाठोपाठ विजयकांत यांनी एनडीएशी काडीमोड घेतल्याने तमिळनाडूत नवी समीकरणे तयार होत आहेत. जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज
आहे.
‘एनडीए’तून बाहेर : अण्णाद्रमुक उमेदवारांचा पराभव करण्याचा इशारा
सन २०११ च्या निवडणुकीत २९ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या डीएमडीकेला आपली जादू कायम ठेवता आली नाही. असे असले तरी या पक्षाकडे अजूनही ८ ते १० टक्के वोटबँक आहे. उत्तर आणि दक्षिण तमिळनाडूमधील ४१ मतदारसंघांत आपले प्राबल्य असल्याचा सुदीश यांचा दावा आहे.
उत्तर तमिळनाडूमधील जागावाटपावरून सत्ताधारी आघाडीत वाद असून, यातून तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याने डीएमडीकेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमडीके स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.