रेल्वे स्टेशनवरुन १२ कॅमेर्यांचे फुटेज घेतले ताब्यात
By admin | Published: May 23, 2016 12:41 AM2016-05-23T00:41:05+5:302016-05-23T00:41:05+5:30
जळगाव: फुले मार्केट व परिसरातील दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी रविवारी जळगाव रेल्वे स्टेशनवरील १२ सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, जळगावात ज्या पध्दतीची चोरी झाली आहे अगदी तशीच पध्दत १ मार्च २०१४ रोजी दिल्लीच्या के.एल.ज्वेलर्समध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे पोलीस यंत्रणा आता दिल्लीच्या दिशेने कुच करीत आहे.
Next
ज गाव: फुले मार्केट व परिसरातील दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी रविवारी जळगाव रेल्वे स्टेशनवरील १२ सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, जळगावात ज्या पध्दतीची चोरी झाली आहे अगदी तशीच पध्दत १ मार्च २०१४ रोजी दिल्लीच्या के.एल.ज्वेलर्समध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे पोलीस यंत्रणा आता दिल्लीच्या दिशेने कुच करीत आहे.शनिवारी भुसावळ, चाळीसगाव येथे जावून पोलिसांनी चौकशी केली असता या महिला तेथील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाच्या रेल्वे स्टेशन प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यातील फक्त जळगावचे फुटेज मिळाले. दरम्यान, या गुन्ाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखाही कामाला लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून यंत्रणा तपासात गुंतली असली तरी या गुन्ाबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. दिल्ली येथे २०१४ मध्ये एका ज्वेलर्समध्ये सहा महिलांनी अशाच पध्दतीने चादर आडवी लावून चोरी केली होती. या ज्वेलर्सला सेंट्रल लॉक असल्याने या चोरीसाठी त्यांना एक तासाचा अवधी लागला होता. त्यामुळे जळगाव व दिल्लीच्या गुन्ातील महिला एकच आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.कोट.. या गुन्ाच्या तपासासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.जिल्ासह राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळते का? याचीही तपासणी केली जात आहे. -नवलनाथ तांबे, पोलीस निरीक्षक