गाढवांना ओढायला लावली 25 लाखांची कार

By admin | Published: March 10, 2017 03:14 PM2017-03-10T15:14:50+5:302017-03-10T15:14:50+5:30

वारंवार खराब होणा-या कारची तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने वैतागलेल्या कारमालकाने गाढवांना आपली 25 लाखांची कार खेचायला लावली

A car of 25 lakhs was thrown into the donkeys | गाढवांना ओढायला लावली 25 लाखांची कार

गाढवांना ओढायला लावली 25 लाखांची कार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - वारंवार खराब होणा-या कारची तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने वैतागलेल्या कारमालकाने गाढवांना आपली 25 लाखांची कार खेचायला लावली. लुधियानामधील ही घटना आहे. या व्यक्तीकडे स्कोडा कंपनीची ऑक्टेव्हिया कार होती. गाडीत रोज होणा-या बिघाडामुळे ते त्रस्त झाला होते. अनेकवेळा त्यांनी आपली कार सर्व्हिस सेंटरला नेली होती, पण तरीही त्यांच्या समस्येचं निरासन झालं नव्हतं. 
 
शेवटी त्रस्त झालेल्या कारमालकारने कारला दोन गाढव बांधून खेचायला लावले. यावेळी त्यांनी गाढवांचं नामकरण करत त्यांना स्कोडा नाव देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं की, 'मी ही कार 19 मार्च 2015 रोजी 25 लाखांना खरेदी केली होती. पण चूक ही झाली की मी कारसोबत दोन गाढव खरेदी नाही केले'.
 
त्यांनी सांगितलं की, 'रोज या कारमध्ये काही ना काही नवीन समस्या निर्माण होत असते. कंपनीकडून कोणतंही उत्तर दिलं नसून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. कंपनीच्या डीलर आणि नॉर्थ रिजनल मॅनेजरकडे त्यांनी याबाबत तक्रारदेखील केली. तसंच फेसबूकवरदेखील आपलं गा-हाणं मांडलं. पण शेवटी काहीच फायदा झाला नाही'. 
 

Web Title: A car of 25 lakhs was thrown into the donkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.