Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:53 AM2022-01-31T07:53:06+5:302022-01-31T07:54:30+5:30

सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

Car Accident: 4 women killed in car crash on the sidewalk | Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू

Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू

googlenewsNext

हैदराबाद - तेलंगणातील करीबनगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. रविवारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत वेगवान धावणारी कार घुसली. या अनियंत्रणीत कारच्या भीषण दुर्घटनेत 4 महिलांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. फरीदा, सुनिता, ललीता आणि ज्योती अशी चार मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. त्यापैकी, ज्योती यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर, इतर महिलांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. तसेच, याप्रकरणी कलम 304 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारमधील ड्रायव्हरसह इतर चौघेही अपघातस्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांकडून या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटवली आहे. 

Web Title: Car Accident: 4 women killed in car crash on the sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.