करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:24 IST2024-12-25T14:23:59+5:302024-12-25T14:24:34+5:30
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करौली-गंगापूर रस्त्यावरील सलेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. करौली-गंगापूर रस्त्यावरील सालेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणारे लोक कैला देवी मातेच्या दर्शनासाठी गेले होते, तेथून परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये इंदूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला.
एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित
घटनेची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना आणि एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय घटनास्थळी पोहोचले. या अपघातात नयन देशमुख, प्रीती भट्ट, मानसबी देशमुख, खुशबू देशमुख, अनिता देशमुख यांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये पती-पत्नीसह चार जण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. ते गुजरातमधील वडोदरा येथे राहत होता. पोलीस प्रशासनाने या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली आहे. या प्रकरणाचा तपास कुरगाव पोलीस करत आहेत.