उड्डाण पुलावर कारचालकाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात 2 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:37 AM2021-09-15T09:37:27+5:302021-09-15T09:45:32+5:30
दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला.
बंगळुरू - कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक्स सिटी उड्डाण पुलावर भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. चारचाकी गाडी चालक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील दुचाकीला जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
इलेक्ट्रॉनिक्स सिटी उड्डाणपुलावर एका वेगवान कारने धडक दिल्याने दुचाकीवरून प्रवास करणारा एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9.45 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बंगळुरू वाहतूक पोलिसांनी दिली. दुचाकीवरुन प्रवास करणारे दोघेजण
Karnataka | A man and a woman travelling on a bike died on the spot after they were hit by a speeding car on the Electronics City flyover & fell off the flyover last night. A case has been registered: Bengaluru Traffic Police pic.twitter.com/PPfudugqJH
— ANI (@ANI) September 15, 2021