कार रोखल्याच्या रागातून अमेरिकेतील शीख पोलिसावर गोळ्या झाडल्या; हल्लेखोर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:44 PM2019-09-28T14:44:40+5:302019-09-28T14:45:09+5:30
धालीवाल गेल्या 10 वर्षांपासून उप प्रशासनिक अधिकारी म्हणून पोलिस खात्यामध्ये कार्यरत होते.
ह्यूस्टन : टेक्सासमध्ये कार रोखल्याच्या रागातून अनिवासिय भारतीय पोलिसाची घोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रशासकीय अधिकारी एड गोंजालेंज यांनी शनिवारी सांगितले की, पोलिस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांनी ड्यूटीवर असताना एका कारला रोखले होते. या कारमध्ये महिला आणि पुरूष होते. हल्लेखोराने कारमधून बाहेर येताच धालीवाल यांच्यावर गोळी झाडली. धालीवाल हे अमेरिकेचे पहिले शिख पोलिस अधिकारी होते.
गोंजालेंज यांच्यानुसार तपास अधिकाऱ्यांना धालीवाल यांच्याकडील कॅमेरामध्ये काही फोटो मिळाले. या फोटोंवरूनच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे फुटेज सर्व पोलिसांना पाठविण्यात आले होते. यामुळे हल्लेखोराला पकडणे सोपे झाले. हल्लेखोराची कारही पोलिसांनी जप्त केली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
धालीवाल गेल्या 10 वर्षांपासून उप प्रशासनिक अधिकारी म्हणून पोलिस खात्यामध्ये कार्यरत होते. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्येही ते लोकप्रिय होते. शीख पगडी आणि दाढीमधील पोलिस पेहरावात काम करणारे ते टेक्सासमधील एकमेव अधिकारी होते.
या घटनेवर एस जयशंकर यांनी सांगितले की, धालीवाल यांच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करतो. तसेच माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही ट्विट करून या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.