दाट धुक्यामुळे कार नाल्यात पडली; 6 ठार, 5 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:10 PM2019-12-30T12:10:13+5:302019-12-30T12:12:30+5:30
वाहनातील सर्वजण उत्तरप्रदेशच्या संभलमधील राहणारे होते. ते दिल्लीला जात असताना हा अपघात झाला.
नोएडा : देशाच्या राजधानीसह उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. दाट धुके पडल्याने दृष्यमानताही कमी झाली आहे. यामुळे समोरिल रस्ता न दिसल्याचे ग्रेटर नोएडामध्ये एक कार नाल्यामध्ये पडली. या भीषण अपघातात दोन अल्पवयीनांसह 6 जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाहनातील सर्वजण उत्तरप्रदेशच्या संभलमधील राहणारे होते. ते दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारसोबत त्यांचीच आणखी एक कार होती. यावेळी प्रवासादरम्यान चालकाला दनकौर भागात दाट धुक्यामुळे रस्ता दिसला नाही. यामुळे अंदाज न आल्याने कार नाल्यामध्ये पडली. पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य़ राबवत सर्वांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले.
Traffic jam on DND (Delhi Noida Direct) flyway following low visibility in Delhi-NCR due to fog. pic.twitter.com/cglsZCfu2L
— ANI UP (@ANINewsUP) December 30, 2019