उभ्या ट्रकवर कार धडकली पाळधीजवळ अपघातात एक ठार : एअर बॅगमुळे तिघे बचावले, मयत मनोहर जोशींचा नातेवाईक
By admin | Published: January 21, 2016 12:03 AM2016-01-21T00:03:42+5:302016-01-21T00:03:42+5:30
जळगाव: महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून येणारी कार धडकल्याने त्यात जोतेंद्र नरसिंह पंडित (वय ५९ रा.चेंबुर,मुंबई) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी कृपा जातेंद्र पंडीत (वय ५०), साडू धनंजय काशीनाथ व्यवहारे (वय ५७ रा.अंधेरी,मुंबई) व्यवहारे यांच्या पत्नी कामिनी व्यवहारे (वय ५१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत पंडित हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलाचे साडू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी अकरा वाजता पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ झाला.
Next
ज गाव: महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून येणारी कार धडकल्याने त्यात जोतेंद्र नरसिंह पंडित (वय ५९ रा.चेंबुर,मुंबई) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी कृपा जातेंद्र पंडीत (वय ५०), साडू धनंजय काशीनाथ व्यवहारे (वय ५७ रा.अंधेरी,मुंबई) व्यवहारे यांच्या पत्नी कामिनी व्यवहारे (वय ५१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत पंडित हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलाचे साडू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी अकरा वाजता पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ झाला.शेगावला गेले होते दर्शनालापंडीत व व्यवहारे हे दोन्ही परिवार शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. शेगाव येथून सकाळी ते कारने (क्र.एम.एच.०२ बी.टी.४३६३)मुंबईला परतीच्या प्रवासाला निघाले. महामार्गावर पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (क्र.एम.एच.१९ जे.००७७) त्यांची कार जावून धडकली. कारचालक धनंजय व्यवहारे यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. मनोहर जोशींनी केला फोनअपघाताची माहिती मिळताच मनोहर जोशी यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना ही माहिती दिली.पाटील हे मुंबईतच असल्याने त्यांनी पाळधी येथे त्यांचे कार्यकर्ते गोकुळ पाटील व जळगावात गजानन मालपुरे यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. गोकुळ पाटील यांनी लागलीच कारमधील चौघांना जळगावला गणपती हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यात चालकाच्या शेजारी बसलेले जोतेंद्र पंडीत यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ट्रकचालकासह कारमधील तीघे बचावलेट्रकमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने चालक देवानंद हिरामन तायडे (वय ४५ रा.पहुर) यांनी रस्त्याच्या बाजूला जॅकवर ट्रक लावला होता.मागील बाजूस खाली दुरुस्तीचे काम करत असताना मागून आलेली ही कार ट्रकवर आदळल्याने तायडे यांनाही जबर मार बसला तर कारमधील अन्य तीघे जण हे एअरबॅगमुळे बचावले. फैजपुर साखर कारखान्यासाठी लागणार ऊस घेण्यासाठी हा ट्रक जवखेडा ता.एरंडोल येथे जात होता.