पोलीस रेकॉर्डमध्ये कार जप्त अन् प्रत्यक्षात कुटुंबच करतंय वापर; नेमकं काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:21 PM2024-03-09T12:21:23+5:302024-03-09T12:22:20+5:30
ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली.
कानपूरमधील सपा आमदार इरफान सोलंकी यांच्या तीन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मात्र त्यातील दोन कार तर आमदारांच्या निवासस्थानीच पार्क केलेल्या आढळल्या आहेत. जप्त केलेल्या या गाड्या आमदारांच्या कुटुंबातील सदस्य चालतात, असं सांगितलं जात आहे. सोलंकी यांना जेलमध्ये भेटायला जाण्यासाठी कुटुंबीय याच कारचा वापर करायचे. मात्र याच दरम्यान जप्त केलेल्या गाड्या या आमदाराच्या घरापर्यंत परत कशा पोहोचल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली. कारचा वापर कुटुंबीय करत होते. त्याचवेळी जप्त केलेली आणखी एक कारही गायब असल्याचं आढळून आलं आहे.
पोलिसांनी जेलमध्ये असलेल्या इरफान सोलंकी यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला आहे. यामध्ये त्याच्या टाटा सफारी, क्रेटा आणि आय-10 या तीन गाड्याही जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण गुरुवारी ईडीने इरफानच्या घरावर छापा टाकला तेव्हा काळ्या रंगाची क्रेटा कार उभी केलेली आढळली. ही तीच कार होती जी पोलिसांनी जप्त केली होती. मात्र ही कार इरफान यांच्या घरी सापडली.
या प्रकरणात, पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की आमदाराची तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यूपीमधील कानपूरमधील समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अलीकडेच सिसामाऊ मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले इरफान सोलंकी आणि त्याचा भाऊ रिझवान सोलंकी यांच्यासह त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले आहेत. दोन्ही भाऊ सध्या जेलमध्ये आहेत.