पुन्हा कार लांबवली अत्यंत वर्दळीच्या प्रभात चौकातील घटना: चोरटे कारमधूनआल्याचा संशय; इच्छादेवी चौकातही कार चोरीचा प्रयत्न; १५ दिवसातील तिसरी घटना
By admin | Published: July 19, 2016 11:41 PM2016-07-19T23:41:01+5:302016-07-19T23:41:01+5:30
जळगाव: राष्ट्रीय महामार्गालगतअसलेल्याअत्यंत वर्दळीच्याप्रभात चौकातील प्रियदर्शनी अपार्टमेंटच्या बाहेर लावलेली प्रशांत रमेश बोंडे यांच्या मालकीची कार (क्र.एम.एच.१९ ए.टी.७७७०) मंगळवारी पहाटे चार वाजता चोरट्यांनी लांबवली. चोरटे मारुती कारमधून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. दरम्यान, इच्छादेवी चौकातूनही कार लांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पंधरा दिवसात कार चोरीची ही तिसरी घटना आहे.
Next
ज गाव: राष्ट्रीय महामार्गालगतअसलेल्याअत्यंत वर्दळीच्याप्रभात चौकातील प्रियदर्शनी अपार्टमेंटच्या बाहेर लावलेली प्रशांत रमेश बोंडे यांच्या मालकीची कार (क्र.एम.एच.१९ ए.टी.७७७०) मंगळवारी पहाटे चार वाजता चोरट्यांनी लांबवली. चोरटे मारुती कारमधून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. दरम्यान, इच्छादेवी चौकातूनही कार लांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पंधरा दिवसात कार चोरीची ही तिसरी घटना आहे.प्रशांत बोंडे यांचे भुसावळ रस्त्यावर कारच्या स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजता ते घरी आले. अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये जागा नसल्याने बाहेर त्यांना कार लावली. सकाळी आठ वाजता उठून पाहिले तर कार जागेवर नव्हती. सुरक्षा रक्षकाने रात्री दीड वाजता ही कार जागेवरच पाहिली होती नंतर पहाटे पाच वाजता कारची स्वच्छता करण्यासाठी तो गेला असता जागेवर कार नव्हती. याबाबतची माहिती त्यांनीबोंडेयांनादिली.दोन कार सीसीटीव्हीत कैदप्रशांत बोंडे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बोंडेंना सोबत घेवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता निलॉन्स कंपनीच्या कार्यालयातील फुटेजमध्ये पहाटेचारवाजताएक मारुती ८०० कार जाताना दिसते व त्यामागे बोंडे यांची कार आहे. याचाच अर्थ चोरटे हे कारने आले होते. पुढे अग्रवाल हॉस्पिटलजवळून वळण घेवून ही कार महामार्गावरुन आकाशवाणीकडे गेली असल्याचेफुटेजमध्यदिसूनयेतआहे.बझरचा नाहीझालाआवाजकारलाधक्का लावला असता बझरचा आवाज येतो,अशी सिस्टिम बोंडे यांनी कारमध्ये बसवली आहे. मात्र ही कार चोरी झाली तेव्हा कोणताच आवाज आला नाही. मास्टर किल्ली किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन ही कार चोरी झाल्याचा संशय आहे. दरम्यान, इच्छा देवी चौकातही कार चोरीचा असाच प्रयत्न झाला आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण वाडिले सोमवारी रात्री विभागीय गस्तीवर होते, त्यांचे वाहन दिसताच चोरट्यांनी धूम ठोकली.डॉक्टरची कार चोरणारे जाळ्यातरिंगरोडवरील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.किशोर पाटील यांच्या निवासस्थानासमोरुही ८ जुलै रोजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कारची चोरी झाली होती. ही कार चोरणारे चोरटे मालेगाव पोलिसांच्या हातात लागले आहेत, मात्र त्यांनी कारबाबत काहीच माहिती दिलेली नाही.अशा आहेत घटना८ जुलै : रिंगरोडवरुन डॉ.किशोर पाटील यांची कार चोरट्यांनी लांबवली१३ जुलै : देवेंद्र नगरातून साईदास राठोड यांच्या कारची चोरी१८ जुलै : प्रभात चौकातून प्रशांत बोंडे यांच्या कारची चोरी