इलायचीदेवी गोएंका यांचे निधन
By admin | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:26+5:302016-01-06T01:51:26+5:30
मुंबई : गौतम बुद्ध यांच्या विपश्यना साधनेचा प्रचार आणि प्रसार करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या पत्नी इलायचीदेवी (८६) यांचे मंगळवारी निधन झाले.
Next
म ंबई : गौतम बुद्ध यांच्या विपश्यना साधनेचा प्रचार आणि प्रसार करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या पत्नी इलायचीदेवी (८६) यांचे मंगळवारी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील विद्युतदाहिनी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होणार आहेत. ब्रम्हदेशात विपश्यनाचार्य सयाजी उ-बा-खिन यांच्याकडून विपश्यना साधना शिकल्यानंतर आचार्य सत्यनारायण गोएंका यांनी भारतासह जगभरात या साधनेची शेकडो अभ्यास केंद्रे सुरू केली. विविध देशात जाऊन गोएंका यांनी विपश्यना साधनेची प्रवचने दिली. विपश्यना साधनेच्या प्रचार व प्रसारात इलायचीदेवी या सत्यनारायण गोएंका यांच्यासोबत होत्या. गोराई येथील भव्य पॅगोड्याच्या उद्घाटनाच्या त्या साक्षीदार होत्या. (प्रतिनिधी)