सावधान! गाय-म्हशींमध्ये आढळला कॅन्सर; दूध पिताना ही काळजी घ्याच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 03:53 PM2019-11-11T15:53:04+5:302019-11-11T15:53:47+5:30
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आतापर्यंत त्यांना मादी जातीच्या घोड्यांमध्येच कॅन्सर असल्याचे माहिती होते.
नवी दिल्ली : जर तुम्ही केवळ तंबाखू सेवन केल्याने कॅन्सर होतो असे समजत असाल तर ते चुकीचे आहे. दूध पिल्यानेही कॅन्सर होण्याचा मोठा धोका आहे. धक्कादायक म्हणजे ही बाब लुवासच्या अहवालात स्पष्ट करण्य़ात आली आहे. लुवासने काही काळापूर्वीच जनावरांचा अल्ट्रासाऊंडद्वारे माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये गायी आणि म्हशींना कॅन्सर झाल्याची संख्या मोठ्याप्रमाणावर आढळली होती.
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आतापर्यंत त्यांना मादी जातीच्या घोड्यांमध्येच कॅन्सर असल्याचे माहिती होते. मात्र, गेल्या काही काळापासून दूध देणाऱ्य़ा जनावरांमध्ये कॅन्सरचे अंश आढळत आहेत.
पशू तज्ज्ञांनी सांगितले की जर या गायी, म्हशींचे दूध न उकळता पिल्यास तुम्हालाही कॅन्सर होऊ शकतो. भारतात हा धोका फार कमी आहे. कारण भारतीय दूध दिवसातून दोन ते तीनदा उकळवतात. यामुळे या दूधातील कॅन्सरचे अंश नष्ट होऊन जातात. यामुळे दूध कमी गॅसवर दोन तीनदा जरूर उकळवावे.
लुवासच्या गायनॅकोलॉजी विभागाचे पशू वैज्ञानिक डॉ. आर के चंदोलिया सांगतात की, आमच्याकडे जी जनावरे आहेत त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक गायी आणि म्हशींच्या गर्भाशयामध्ये कॅन्सर आढळला आहे. त्यांचे गर्भाशय काढून उपचार केले जाऊ शकतात.
कारण काय?
पाळीव जनावरांना जो चारा दिला जातो त्यामध्ये रासायनिक घटकांची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. तसेच शेतीसाठी वापरले जाणारे रासायनिक घटक पावसाच्या पाण्यात मिसळून जलाशय, विहीरींमध्ये जातात. हे पाणी पिल्याने त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.