फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:35 AM2022-09-01T11:35:43+5:302022-09-01T11:36:16+5:30
व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला.
नवी दिल्ली : व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला.
कोणती माहितीचोरली गेली?
अहवालात म्हटले आहे की, व्होडाफोन आयडियाच्या प्रणालीतील त्रुटींमुळे ग्राहकांचा कॉल डाटा रेकॉर्ड सार्वजनिक झाला. एखादा दूरध्वनी कधी करण्यात आला, तो किती वेळ सुरू होता, कोणत्या ठिकाणाहून तो दूरध्वनी करण्यात आला, दूरध्वनी करणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, एसएमएस, तसेच त्याच्या मोबाइलमध्ये असलेले सर्व दूरध्वनी क्रमांक यांची माहिती सार्वजनिक झाली आहे.
५.५ कोटी ग्राहकांचा तपशील धोक्यात?
सायबरएक्स९ने अहवालात दावा केला आहे की, ५.५ कोटी ग्राहकांची माहिती उघड होण्याचा धोका आहे. ज्यांनी व्होडाफोन आयडिया नेटवर्कचे कनेक्शन काढून टाकले, तसेच ज्यांनी या कंपनीचे मोबाइल कनेक्शन घेण्याची केवळ इच्छा व्यक्त केली, अशांचाही या ग्राहकांमध्ये समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे.
(वृत्तसंस्था)