कारगिल विजय दिवस; कारगिल युद्धातील दहा महत्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:40 AM2019-07-26T09:40:38+5:302019-07-26T09:40:43+5:30
1999 च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले.
मुंबई- कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
1999 च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले. त्यानंतर भारताने ऑपरेशन विजय या कारवाईला सुरुवात केली.
कारगिल युद्धासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:
1) कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 1999 साली झाले होते.
2) या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.
3) कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते.
4) हे युद्ध प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ 1999 साली मे ते जूलै या महिन्यांमध्ये झाले.
5) दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती.
6) दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. यावेळेस भारताने सफेदसागर या नावाने हवाई कारवाई केली.
7) कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते.
8) ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै रोजी जाहीर केले.
9) 26 जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले.
10) या युद्धात भारताच्या 500 लोकांना हौतात्म्य आले. तर भारतीय सैन्याने 3000 पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.