मालवाहू जहाजाला भीषण आग, 22 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 04:28 PM2018-06-14T16:28:50+5:302018-06-14T16:32:12+5:30
एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला बुधवारी रात्री समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या जहाजात अडकलेल्या 11 क्रू मेंबर्सची भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जहाजात असलेल्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलकाता: एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला बुधवारी रात्री समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या जहाजात अडकलेल्या 22 क्रू मेंबर्सची भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जहाजात असलेल्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच हल्दियामधून भारतीय तटरक्षक दलाने राजकिरण जहान आणि डॉर्निअर विमान बचावासाठी पाठविले. खवळलेला समुद्र आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.
The Indian Coast Guard ship Rajkiran and Dornier aircraft rescued all the 22 crew members on board Indian flag Container vessel, MV SSL Kolkata after it caught fire last night
— ANI Digital (@ani_digital) June 14, 2018
Read @ANI story | https://t.co/a0q2GI0Y5ppic.twitter.com/dMa0sKxhFk
या घटनेची माहिती देताना तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, मालवाहू एसएसएल कोलकाता जहाजातून 464 कंटेनर्स घेऊन जात होते. आगीवर सध्या नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. कोलकाता बंदर आणि इतर ठिकाणाहून मदत पोहचवली जात आहे. तसेच, जहाजात अडकलेल्या 22 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यात आली.
#WATCH Merchant Vessel SSL KOLKATA caught fire last night; 11 out of 22 crew members rescued by Indian Coast Guard ship Rajkiran from Haldia, rescue operation for remaining crew members underway pic.twitter.com/FS6KccSSQA
— ANI (@ANI) June 14, 2018