गौरी लंकेश मारेकऱ्यांच्या ‘हिट लिस्ट’वर कर्नाडही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:36 AM2018-07-26T04:36:34+5:302018-07-26T04:37:03+5:30
‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याची माहिती
बंगळुरु: पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘एसायटी’ला तपासात संशयित गुन्हेगरांकडून एक डायरी मिळाली असून त्यात संभाव्य लक्ष्यांची जी ‘हिट लिस्ट’ दिलेली आहे त्यामध्ये चित्रपट अभिनेते गिरीश कर्नाड यांचेही नाव असल्याचे समजते.
‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीवर सांगितले की, अटक केलेल्या एका कट्टर हुंदुत्ववादी संघटनेच्या सदस्याकडून ही डायरी मिळाली. त्यात देवनागरीमध्ये ‘हिट लिस्ट’ दिलेली आहे. त्यात गौरी लंकेश यांचे नाव दुसºया क्रमांकावर होते. तसेच गिरीश कर्नाड, राजकीय नेते व लेखक बी. टी. ललिता नाईक, निदुमानिधी मठाचे प्रमुख वीरभद्र चंद्रमल स्वामी आणि पुरोगामी विचारवंत सी. एस. व्दारकानाथ यांचाही समावेश आहे. हे सर्व कट्टर हिंदुत्ववादाचे टीकाकर आहेत.
दरम्यान, लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ने कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी येथून राजेश डी. बंगेरा (५०) या १० व्या संशयितास अटक केली. न्यायालयाने त्यास ६ गस्टपर्यंत कोठडी दिली. त्याचा हत्येत नेमका कसा सहभाग होता हे स्फ्ट झाले नाही. मात्र आधी पकडलेल्या अमोल काळे व अमित डेगवेकर या आरोपीच्या बंगेरा संपर्कात होता, असे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे.