लज्जास्पद ! मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही त्यावरुन धावत होत्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 12:55 PM2018-01-13T12:55:51+5:302018-01-13T12:59:08+5:30

राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 24 वर हिट अॅण्ड रनच्या घटनेनंतर मृतदेह तासनतास रस्त्यावर पडून होता. धक्कादायक म्हणजे मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला असताना एकाही चालकाने गाडी थांबवण्याची तसदी घेतली नाही.

Cars ran over dead body in delhi | लज्जास्पद ! मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही त्यावरुन धावत होत्या गाड्या

लज्जास्पद ! मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही त्यावरुन धावत होत्या गाड्या

googlenewsNext

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 24 वर हिट अॅण्ड रनच्या घटनेनंतर मृतदेह तासनतास रस्त्यावर पडून होता. धक्कादायक म्हणजे मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला असताना एकाही चालकाने गाडी थांबवण्याची तसदी घेतली नाही. मृतदेहावरुन गाड्या धावत होत्या, मात्र कोणीही गाडी थांबवून मृतदेह रस्त्याच्या शेजारी ठेवला नाही किंवा पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली नाही. जवळपास 200 मीटरपर्यंत मृतदेह फरफटत होता. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. 

मृत व्यक्तीचं वय 35 असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. ही दुर्घटना पांडव नगर परिसरात झाली आहे. पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवण्याचा आणि बेजबाबदारणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता पोलिसांना राष्ट्रीय महामार्ग 24 वर गाजीपूरच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर अक्षरधाम पुलाच्या बोर्डाजवळ एक मृतदेह पडला असल्याचा कॉल आला होता. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुर्घटना झाल्याच्या ठिकाणापासून ते जवळपास 200 मीटरपर्यंत मृतदेहाचे तुकडे पसरले होते. पोलिसांनी मृतदेह लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पोहचवला. मृतदेह पाहून अंदाज लावला जात आहे की, एखाद्या गाडीने धडक दिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या तरुणाचा मृत्यू झाला असावा. नंतर अनेक गाड्या मृतदेहावरुन गेल्या असतील. 

पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीजवळ एक तंबाखूची पुडी मिळाली आहे. तसंच हातावर काळा धागा बांधलेला आहे. ओळख स्पष्ट होईल अशी कोणतीच गोष्ट मिळालेली नाही. मृतदेहाजवळ काही नाणी पडली होती. पोलिसांनी मिळालेल्या गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती पोलीस सध्या तपासत आहेत. 

तरुणाला धडक देऊन पळून जाणा-या गाडीचा शोध घेण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसंच मृत व्यक्ती इतक्या पहाटे घटनास्थळी काय करत होता याचाही पोलीस शोध घेत आहेत. कारण घटनास्थळी कोणतीही दुसरी कार मिळालेली नाही. 

Web Title: Cars ran over dead body in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात