ISRO : ‘कार्टोसॅट-३’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:41 AM2019-11-27T03:41:09+5:302019-11-27T03:41:33+5:30

ISRO : पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाला अवघे २६ तास उरले आहेत.

'Cartosat-1' launches today from Sriharikota | ISRO : ‘कार्टोसॅट-३’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

ISRO : ‘कार्टोसॅट-३’चे आज श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

Next

चेन्नई : पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाच्या प्रक्षेपणाला अवघे २६ तास उरले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-३ सोबत अमेरिकेच्या १३ नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण होणार आहे. येथून १२० किलोमीटरवरील श्रीहरिकोटा अवकाशतळावरील दुसºया लाँचपॅडवरून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२८ वाजता कार्टोसॅट-३ च्या प्रक्षेपणाचे नियोजन इस्रोने केले आहे.
पीएसएलव्ही-सी ४७ च्या प्रक्षेपण मोहिमेच्या २६ तासांच्या उलटमोजणीला मंगळवारी सकाळी ०७.२८ वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाली आहे, असेही इस्रोने म्हटले.

Web Title: 'Cartosat-1' launches today from Sriharikota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.