कार्टोसॅट-2 देणार पाकिस्तानच्या बंकर, टेरर कॅम्पची खडानखडा माहिती
By admin | Published: June 23, 2017 10:45 AM2017-06-23T10:45:59+5:302017-06-23T10:45:59+5:30
उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रहाला अवकाश कक्षेत स्थिर करुन इस्त्रोची जबाबदारी संपत नाही. भारताप्रमाणेच जगातील अनेक देश आपले उपग्रह अवकाशात पाठवत असतात.
Next
ऑनलाइन लोकमत
- कार्टोसॅट - 2 मालिकेतील हा सहावा उपग्रह आहे. त्याचे वजन 712 किलो आहे. अन्य 30 नॅनो उपग्रहांचे मिळून एकत्रित वजन 243 किलो आहे.
- कार्टोसॅट - 2 मालिकेतील सहाव्या उपग्रहामुळे भारतीय संरक्षण दलांना मोठी मदत मिळणार आहे. दहशतवाद्यांचे तळ, बंकर याची खडानखडा माहिती मिळेल.
- कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांना भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करताना या उपग्रहांची मदत घेण्यात आली होती.
- उच्च क्षमतेची छायाचित्र, डाटा मिळवण्यासाठी कार्टोसॅट मालिकेतील सहाव्या उपग्रहाची आवश्यकता होती. भारताला ठराविक डाटासाठी दुस-यांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यासाठी सहावा उपग्रह आवश्यक होता.
- कार्टोसॅट मालिकेतील उपग्रह अशा पद्धतीने बनवण्यात आले आहेत की, महत्वाच्या प्रसंगी एखाद्या ठराविक भागाचे छायाचित्र तुम्हाला मिळू शकते.
- पीएसएलव्ही सी 38 चे उड्डाण ही इस्त्रोची 90 वी मोहिम होती.
- 30 नॅनो उपग्रहांमध्ये 29 परेदशी आणि एक भारतीय उपग्रह आहे.
- ऑस्ट्रीया, बेल्जियम, ब्रिटन, चिली, झेक प्रजासत्ताक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, लाटविया, लिथुनिया, स्लोवाकिया आणि अमेरिका या 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह आहेत.
- तामिळनाडूसाठी सुद्धा हे प्रक्षेपण महत्वाचे आहे. कारण कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला नॅनो उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल.
- PSLV-C38 रॉकेटव्दारे सर्व 31 उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येतील. पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण आहे.
आणखी वाचा
ISRO समोर असते अवकाश कच-यापासून उपग्रह वाचवण्याचे आव्हान
अवकाश संशोधनात विक्रमी झेप घेणा-या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आजवर अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. समस्त भारतीयांनाही इस्त्रोच्या या कामगिरीचा अभिमान आहे. पण उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रहाला अवकाश कक्षेत स्थिर करुन इस्त्रोची जबाबदारी संपत नाही. भारताप्रमाणेच जगातील अनेक देश आपले उपग्रह अवकाशात पाठवत असतात. त्यातून मोठया प्रमाणावर अवकाश कचरा तयार होतो. त्या कच-यापासून आपल्या उपग्रहाचे रक्षण करण्याची जबाबदारी इस्त्रोवर असते.