बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Published: July 18, 2016 06:26 PM2016-07-18T18:26:23+5:302016-07-18T18:26:23+5:30

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

Case against rape: Fast track proceedings in court | बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next
गाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, साहस फाउंडेशनच्या सरीता माळी, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप सुरवाडे, शिवसेनेच्या महिला संघटक मंगला बारी, महानगरप्रमुख शोभा चौधरी, सुनिता भालेराव, लता ढोबळे, मनसेच्या वैशाली विसपुते, दिलीप सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा शिरसाठ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी उपमहापौर करीम सालार, रोटरीचे गनी मेमन, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होेते. यावेळी अहमदनगर जिल्‘ातील कोपर्ली तसेच जळगावातील रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच अहमदनगर व जळगाव येथील अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेला मनोधैर्य योजनेतंर्गत मदत करण्यात येईल. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या मागण्यांचे निवेदन केले सादर
कोपर्डी गावातील आरोपी कोणाशीही संबंधित असले तरी त्यांना शासनाने कुठलीही गय न करता हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा.
रामेश्वर कॉलनीतील मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यातील मुली व महिलांना मुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुक्त व सुदृढ वातावरण करण्यासाठी प्रचार व कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाबाबत लोकांच्या मनातील भीती कशामुळे कमी होतेय याबाबत गांभिर्याने आत्मचिंतन केले जावे.
अहमदनगर जिल्‘ातील अत्याच्याराच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर पावले उचलण्यात यावे.
महाराष्ट्रातील सर्व बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.

Web Title: Case against rape: Fast track proceedings in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.