यूपी विधानसभा स्फोटकं प्रकरणी NIAचा तपास सुरू
By admin | Published: July 15, 2017 08:46 AM2017-07-15T08:46:37+5:302017-07-15T08:46:37+5:30
यूपी विधानसभा स्फोटकं प्रकरणी एनआयएचं 13 जणांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे. पथकाने या घटनेची चौकशी करायला सुरूवात केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 15- उत्तरप्रदेश विधानसभेत गुरूवारी रात्री स्फोटक पदार्थ आढळून आला होता. या प्रकरणावरून विधानसभेत सध्या खळबळ उडाली आहे. विधानसभेत स्फोटक कशी आली? याची चौकशी एनआयएमार्फत व्हावी, अशी मागणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार एनआयएचं 13 जणांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे. या 13 जणांच्या पथकाने या घटनेची चौकशी करायला सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरून ही चौकशी सुरू झाली आहे. या घटनेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या सगळी औपचारीकता पूर्ण झाली असून आता तपासाला सुरूवात झाली आहे, असं डीजीपी सुलखान सिंह यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?
पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागा! - उद्धव ठाकरे
मणिपूरमधील बनावट चकमकींची सीबीआय चौकशी
शुक्रवारी सध्याकाळी एनआयएच्या 13 सदस्यांच्या पथकाने एटीएसच्या पोलीस अधिकाऱ्यांसह विधानभवनाची पाहणी केली. तसंच टीमने घटनास्थळावरून काही माहितीही गोळा केली आहे. 11 आणि 12 जुलै रोजी विधानभवनात आलेल्या लोकांची नाव नोंदविण्यात आली आहे. तसंच ज्या लोकांची चौकशी केली जाणार आहे, अशांची यादीही एनआयएच्या पथकाने तयार केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाने विधानभवनातील सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी केली आहे. पण त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले नाहीत.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडल्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. विधानसभेत सापडलेली स्फोटकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट असून त्याबद्दलची खरी माहिती हे समोर आलीच असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं होतं. शुक्रवारी विधान सभेच्या , बुधवारी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली स्फोटक पदार्थ सापडले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN) असल्याचे निष्पन्न झालं. १५० ग्रॅम पीईटीएन विधानसभेत सापडलं होतं.