महिलांवरील अत्याचारांची प्रकरण्
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:52+5:302015-05-05T01:21:52+5:30
ो हाताळण्यासाठी अनुभवी न्यायधिशंाची नियुक्ती गरजेची: ॲड.लोटलीकर
Next
ो हाताळण्यासाठी अनुभवी न्यायधिशंाची नियुक्ती गरजेची: ॲड.लोटलीकर मडगाव : देशात महिलांवर होणरया अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली असून अशी महिलांवर होणारया अत्याचारांची प्रकरणे हाताळण्यासाठी महिला न्यायधिशांची नाहीतर अनुभवी न्यायधिशांची नियुक्ती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे वकील सरेश लोटलीकर यांनी रवींद्र भवनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना गोवा शाखेच्या तिसरया वर्धापनदिना निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर ॲड। उदय भंेब्रे, ॲड. जगदिश प्रभूदेसाई,संघटनेचे अध्यक्ष नवनाथ खांडेपारकर सरचिटणीस शिबू रेगनाथन उपस्थित होते.काही प्रकरणात आरोपीना आजन्मकारावासाची शिक्षा होते.तर काही प्रकरणात आरोपीना पुराव्या अभावी निर्दोष मुकत्तता होते.काही मोठ्या खाजगी आस्थापनात महिलावर मोठ्या प्रमाणात लैंगीक अत्याचार होत असल्याची प्रकरणे होत असल्याचे दिसून येत आहे. या आस्थापनात त्याच्या वरीष्ठाच्या मर्जीनूसार कामगारांचे पगार वाढ व पदोन्नती होत असल्याने तो एक प्रकारचा अत्याचारच असल्याचे ते म्हणाले. महिलां सुरक्षित नसल्याने त्यांनी आपली सुरक्षा आपणच करण्याची वेळ आली आहे.महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे पुरूषांच्या बरोबरीने त्या काम करीत आहेत परंतू आजही समाजात त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते.पुर्वीच्या काळी महिला या स्वयंपाक घरापुरत्या मर्यादित होत्या परंतू आज महिला सुशिक्षित असल्याने सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. ॲड. उदय भेंब्रे यांनी आपले विचार मांडताना आपल्या देशात तयार करण्यात आलेले कायदे हे गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत परंतू गुन्हा घडू नये यासाठी काळजी घेण्यासाठी कायदे तयार करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे नवी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे व ती मानवाधिकारी गोवा शाखेने काम हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.व नागरिकांना मनुष्यपणाचे शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.प्रमुख पाहूणे ॲड.सरेश लोटलीकर यांच्या हस्ते नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली तसेच कृष्णी वाळके व सरीता चव्हाण यांच्या त्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला व ॲड. उदय भेंब्रे यांच्याहस्ते सुमन सामंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॅा. उदय बरड यांनी केले.(प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-09कॅप्शन: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना गोवा शाखेच्या तिसर्या वर्धापनदिनी कार्यक्रमात बोलताना उच्च न्यायालयाचे वकील सरेश लोटलीकर सोबत इतर मान्यवर. (छाया पिनाक कल्लोळी)