लाचखोर अधिकार्याला एका दिवसाची पोलीस कोठडी जिल्हा न्यायालय : साडेसहा रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण
By admin | Published: July 16, 2016 12:38 AM2016-07-16T00:38:41+5:302016-07-16T00:38:41+5:30
जळगाव : पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातून शेतीकरिता पाणी उपसा परवानगी प्रस्ताव पाठविण्यासाठी सहा हजार ५०० रुपयांची लाच घेणारे पाटबंधारे विभागातील मोजणीदार शाखाधिकारी बळीराम केशव जाधव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
Next
ज गाव : पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातून शेतीकरिता पाणी उपसा परवानगी प्रस्ताव पाठविण्यासाठी सहा हजार ५०० रुपयांची लाच घेणारे पाटबंधारे विभागातील मोजणीदार शाखाधिकारी बळीराम केशव जाधव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बळीराम जाधव यांना १४ जुलै रोजी अटक केली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जाधव यांना शुक्रवारी पोलिसांनी न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे यांनी तर संशयितातर्फे ॲड.मोरे यांनी कामकाज पाहिले.