प्रियकराच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप
By admin | Published: March 24, 2016 10:37 PM2016-03-24T22:37:05+5:302016-03-24T23:37:35+5:30
कोल्हापूर : पत्नीच्या प्रियकराचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी (दि. २३) ठोठावली. अशोककुमार दसरूराम सलाम (वय ३०, रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर, मूळ रा. देवरी, ता. कोरर, जि. काकीर, छत्तीसगड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासले.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, उचगाव येथील कच्छी यांच्या स्क्रॅप गोडावूनमध्ये अशोककुमार सलाम हा कामास होता. त्याच ठिकाणी एक महिला कामास होती. त्यातून अशोककुमार व त्या महिलेचे प्रेमसंबंध जुळले व त्यांनी विवाह केला. याच ठिकाणी विजय राजाराम पवार (२६, रा. उचगाव) हा दिवाणजी कामाला होता. त्यातून तिघांची मैत्री झाली. त्यानंतर अशोककुमारची पत्नी व विजय पवार याचे प्रेमसंबंध जुळले. हा प्रकार अशोककुमारला समजला. याचा राग त्याच्या मनात होता.
३१ ऑगस्ट २००९ रोजी अशोककुमार हा दोन साथीदारांच्या मदतीने विजय पवारला घेऊन उचगाव येथील ओम साई पेट्रोल पंपाच्या पिछाडीस आला. त्याठिकाणी विजय पवारचा टॉवेलने गळा आवळून या तिघांनी खून केला व त्याचा मृतदेह खड्ड्यामध्ये पुरला. दरम्यान, खुनानंतर अशोककुमार हा छत्तीसगडमधील आपल्या गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गांधीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन साहाय्यक निरीक्षक आर. व्ही. कोतमिरे यांच्यासह कर्मचार्यांनी पकडले. पण अशोककुमार सलाम हा मी खून केला नसल्याचे खोटे बोलू लागला. परंतु, पोलिसांनी चौकसपणे व कसून तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली.