महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या, एथिक्स कमेटीने केली खासदारकी रद्द करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:47 PM2023-11-08T21:47:54+5:302023-11-08T21:49:27+5:30

कैश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.

cash-for-query-case-mahua-moitra-ethics-committee-recommends-ending-mahua-moitra-parliament-membership | महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या, एथिक्स कमेटीने केली खासदारकी रद्द करण्याची शिफारस

महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या, एथिक्स कमेटीने केली खासदारकी रद्द करण्याची शिफारस

Cash for Query case Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभेच्या एथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. शिवाय, या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारसदेखील समितीने केल्याची माहिती आहे. सूत्रांचे म्हणणे आहे. दर्शन हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली आहे.

कॅश फॉर क्‍वेरी वाद वाढल्यानंतर महुआ यांनी कबूल केले होते की, त्यांनी लॉगिन आयडी आणि लोकसभेच्या वेबसाइटचा पासवर्ड व्यापारी दर्शन हिरानंदानीसोबत शेअर केला होता. जेणेकरुन तो त्याच्या वतीने प्रश्न विचारू शकेल. लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याच्या आरोपावर समितीने महुआ यांना या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.

सीबीआय चौकशीचे आदेश    
लोकपालांनी सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, माननीय लोकपाल यांनी आज मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. निशिकांत दुबे यांनीच महुआ मोईत्रांवर आयडी-पासवर्ड शेअर केल्याचा आरोप केला होता.

काय आहे प्रकरण ?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, महुआ मोईत्रा यांनी लॉग-इन पासवर्ड दर्शन हिरानंदानी नावाच्या व्यक्तीला दिला, ज्याद्वारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आले. याबाबत दुबेंनी आयटी मंत्र्यांकडे तक्रार केली होती. 

Web Title: cash-for-query-case-mahua-moitra-ethics-committee-recommends-ending-mahua-moitra-parliament-membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.