Arpita Mukherjee : बापरे! मोडकळीस आलेल्या घरात राहते 'कॅश क्वीन'ची आई; अर्पिता मुखर्जीच्या पैशांची माहितीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:47 AM2022-07-30T11:47:29+5:302022-07-30T11:56:51+5:30

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीच्या आईला आपल्या लेकीकडे किती पैसा आहे याची कल्पनाच नसल्याचं आता समोर आलं आहे. 

cash queen Arpita Mukherjee mother living poverty dont talk about daughter | Arpita Mukherjee : बापरे! मोडकळीस आलेल्या घरात राहते 'कॅश क्वीन'ची आई; अर्पिता मुखर्जीच्या पैशांची माहितीच नाही

Arpita Mukherjee : बापरे! मोडकळीस आलेल्या घरात राहते 'कॅश क्वीन'ची आई; अर्पिता मुखर्जीच्या पैशांची माहितीच नाही

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे. या प्रकरणी ईडी मनी ट्रेलचा तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने पार्थची सहकारी आणि या शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवर छापेमारी केली. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्पिता मुखर्जीच्या आईला आपल्या लेकीकडे किती पैसा आहे याची कल्पनाच नसल्याचं आता समोर आलं आहे. 

पश्चिम बंगालमधील एका जुन्या, मोडकळीस आलेल्या घरामध्ये त्या राहतात. हे घर उत्तर 24 परगनाच्या बेलघोरिया परिसरात आहे. येथे अर्पिताची आई मिनती मुखर्जी या एकट्याच राहतात. हे घर जवळपास 50 वर्षे जुनं आहे. या घरामध्ये अर्पिताच्या वृद्ध आणि आजारी असलेल्या आईकडे कोणतंच मौल्यवान सामान देखील नाही. मुलगी सोयीसुविधा आणि श्रीमंतीचं आयुष्य जगत असताना दुसरीकडे आईजवळ मात्र आवश्यक गोष्टींची देखील कमतरता असलेली पाहायला मिळत आहे. 

अर्पिताने आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी दोन हाऊस हेल्पर ठेवले आहे. ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता कधी कधी आपल्या आईला एका कारमधून भेटायला येते. पण ती येथे जास्त वेळ थांबत नाही. अर्पिताच्या आईने आपल्या लेकीबाबत बोलण्यास नकार दिला आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. ईडीच्या पथकाने अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकल्यानंतर सापडलेली रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. दोन हजारांच्या नोटांच अक्षरशः ढिग सापडला. एवढेच नाही तर सोन्याच्या वीटा, दागिने, विदेशी चलन आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. 

ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. म्हणजेच आतापर्यंत ईडीच्या पथकाने 55 कोटींहून अधिकचा काळा पैसा जप्त केला आहे.फ्लॅटमधून सुमारे 30 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. यासोबतच दागिने आणि पाच किलो सोनेही सापडले आहे. सोन्याची किंमत 4.31 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. त्यांच्या शेजारील लोकांनाही या एवढ्या मोठ्या संपत्तीबाबत माहिती नव्हती.

अर्पिता मुखर्जीचा हा दुसरा फ्लॅट आहे, यापूर्वी ईडीला अर्पिता मुखर्जीच्या टालीगंजमधील फ्लॅटमधून 21 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच ईडीने अर्पिताच्या दोन घरांतून 50 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली असून, दोघांना 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. ईडीच्या छाप्यात 55.43 कोटींहून अधिकची रक्कम सापडली आहे. सोन्याची एकूण रिकव्हरी सुमारे 5 किलो आहे, ज्यामध्ये 1-1 किलो वजनाच्या 3 सोन्याच्या पीटा आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या पेनाचा समावेश आहे. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

 

Web Title: cash queen Arpita Mukherjee mother living poverty dont talk about daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.