इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:32 PM2022-07-02T12:32:20+5:302022-07-02T12:33:19+5:30

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला.

cashew nut consumption in india at record level export down after pandemic | इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

Next

नवी दिल्ली-

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला. याच कारणामुळे सुकामेवा आणि इतर आरोग्य वर्धक पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. काजूच्या विक्रीतही कोरोना महामारीनंतर तब्बल दीडपट वाढ झाली आहे. 

काजू आणि कोकोआ विकास निर्देशालयानं (DCCD) दिलेल्या माहितीनुसार देशात काजूची वाढती विक्री पाहता उत्पादक देखील निर्यातीपेक्षा घरगुती बाजारावर लक्ष केंद्रीत करत आहेत. देशातील काजूची वार्षिक विक्रीत वाढ होऊन ३ लाख टनपर्यंत पोहोचली आहे. कोरोना महामारीआधी हाच आकडा २ लाख टन इतका होता. एका वर्षाआधी ब्रांडेड काजूची विक्री देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. 

६० टक्के मागणी आयतीनं पूर्ण केली जाते
देशातील वापराच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढत नाही. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. ६० टक्के मागणी केवळ आयातीतून भागवला जातो. २०२१-२२ मध्ये, भारताने ७.५ लाख टन काजूचे उत्पादन केले, तर या काळात कच्च्या काजूची आयात ९.३९ लाख टन होती. मात्र, त्यानुसार त्याचा वापर वाढत असल्याने लवकरच ही आयात दहा लाख टनांचा टप्पा पार करेल. देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमताही १८ लाख टनांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.५ दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर वैयक्तिक वापर फक्त १० ते १५ टक्के आहे.

सप्टेंबरपासून काजूचे दर वाढतील
काजूच्या मागणीच्या अनुषंगाने दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचे भाव वाढू लागतील. सध्या 950-1,200 रुपये किलोने विकले जाणारे प्रीमियम काजू 700-850 रुपये दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही ५५० ते ६५० रुपये किलोपर्यंत आहे. उत्पादनांना आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काजूच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

निर्यातीत 50 टक्के घट
महामारीनंतर काजूचा देशांतर्गत वापर वाढला पण निर्यात मात्र कमी होत आहे. याचे कारण व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत, भारत दरवर्षी 1,00,000 टन काजू निर्यात करत असे, जे 2021-22 मध्ये 51,908 टनांवर आले आहे. याउलट, व्हिएतनाममध्ये स्थानिक वापर कमी झाला आहे आणि निर्यातीत वाढ होत आहे. व्हिएतनाम आता जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदार देश बनला आहे. तिथून दर महिन्याला जेवढी काजूची निर्यात होते, तेवढी भारत आता वर्षभरात होते.

Web Title: cashew nut consumption in india at record level export down after pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :saleविक्री