‘कॅशलेस’मुळे झाले ४५ जण लखपती

By admin | Published: January 16, 2017 06:51 AM2017-01-16T06:51:50+5:302017-01-16T06:51:50+5:30

मोदी यांनी जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेतील सोडतीमध्ये आतापर्यंत दर आठवड्याला १५ याप्रमाणे देशातील ४५ जण लखपती झाले

'Cashless' has 45 people, Lakhpati | ‘कॅशलेस’मुळे झाले ४५ जण लखपती

‘कॅशलेस’मुळे झाले ४५ जण लखपती

Next


नवी दिल्ली : अधिकाधिक लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेतील सोडतीमध्ये आतापर्यंत दर आठवड्याला १५ याप्रमाणे देशातील ४५ जण लखपती झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार विजेत्यांना या योजनेखाली एकूण ५४ कोटी ९0 लाख रुपये किमतीची बक्षिसे देण्यात आल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) दिली आहे.
पंतप्रधानांनी जाहीर केलल्या या योजनेत दर आठवड्याला ६१४ जणांना ५0 हजार रुपयांचे, ६५00 जणांना १0 हजार रुपयांचे तर १५ हजार विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. ही बक्षिसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कॅशलेस व्यवहारांतील ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिगी धन व्यापार योजना पंतप्रधानांनी जाहीर केली होती. निती आयोगातर्फे जूनपर्यंत योजना राबविण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>बम्पर बक्षीस एक कोटींचे
या लकी ड्रॉ मध्ये महाराष्ट्र आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यांतील विजेते अधिक आहेत. सर्वात मोठे बक्षीस (बम्पर ड्रॉ) १४ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यात ग्राहकांसाठी १ कोटी, ५0 लाख व २५ लाख रुपये किंमतीचे प्रत्येकी एक बक्षीस असेल, तर व्यापाऱ्यांसाठी असलेल्या योजनेतून ५0 लाख, २५ लाख व १२ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
>ज्येष्ठांची संख्याही उल्लेखनीय
नोटाबंदीनंतर चलनतुटवडा जाणवू लागताच पंतप्रधानांनी देशातील लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांसाठी
दोन लकी ड्रॉ काढण्याची घोषणा केली होती. एनपीसीआयने त्याचे निकाल जाहीर केले आहेत. योजनेत बक्षिसे मिळवणाऱ्यांमध्ये ५0 वर्षांवरील नागरिकांची संख्याही उल्लेखनीय आहे.

Web Title: 'Cashless' has 45 people, Lakhpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.