गुजरातच्या भडोच शहरातील रामाचं मंदिर कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:21 AM2017-10-24T05:21:53+5:302017-10-24T05:21:59+5:30

नोटाबंदीनंतर अनेकांच्या खिशात रोकडच शिल्लक राहिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याची घोषणा केली.

Cashless house in Rama's temple in Badhope city of Gujarat | गुजरातच्या भडोच शहरातील रामाचं मंदिर कॅशलेस

गुजरातच्या भडोच शहरातील रामाचं मंदिर कॅशलेस

googlenewsNext


नोटाबंदीनंतर अनेकांच्या खिशात रोकडच शिल्लक राहिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याची घोषणा केली. त्यासाठी भीमसह अनेक सरकारी व खासगी अ‍ॅपही आले. ब-याच दुकानदारांनी स्वाइप मशिन्स खरेदी करून कॅशलेस व्यवहार सुरूही केले. दुकानदारांपर्यंत समजण्यासारखं आहे. पण देशातील काही मंदिरांनीही कॅशलेसची सुरुवात तेव्हा केली आणि ती अद्याप सुरूच आहे. म्हणजे मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर दानपेटीत रोख रक्कम टाकण्याऐवजी ती डेबिट वा क्रेडिट कार्डद्वारे मंदिराच्या खात्यातच जमा करायची. गुजरातच्या भडोच शहरातील नर्मदा व्हॅली फर्टिलाइजर अँड केमिकल्सच्या टाऊनशिपमध्ये असंच एक रामाचं मंदिर आहे. जन विकास मंदिर या नावानं ते ओळखलं जातं. तिथं दानपेटीत पैसे टाकण्याची वेळ येतच नाही. देवाशीही व्यवहार कॅशलेस होतो. मंदिर परिसरात शिव, कृष्ण, दुर्गा यांचीही मंदिरं आहेत. प्रत्येक ठिकाणचं खातं वेगळं आणि पीएसओ म्हणजे स्वाइप मशीनही वेगळं. पेटीएम, भीम आदी अ‍ॅपद्वारे तुम्ही हे व्यवहार करू शकता.

Web Title: Cashless house in Rama's temple in Badhope city of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.