कॅशलेस लकी ड्रॉ - 45 जण झाले लखपती

By admin | Published: January 15, 2017 12:05 PM2017-01-15T12:05:19+5:302017-01-15T12:05:19+5:30

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला दोन लकी ड्रॉ योजनांची घोषणा केली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे.

Cashless Lucky Draw - 45 Attacks Lakhpati | कॅशलेस लकी ड्रॉ - 45 जण झाले लखपती

कॅशलेस लकी ड्रॉ - 45 जण झाले लखपती

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली , दि. 15 - भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर सरकारने त्या नोटांमुळे ओढावलेले आर्थिक संकट कमी करण्यासाठी कॅशलेसची संकल्पना पुढे आणली. कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला दोन लकी ड्रॉ योजनांची घोषणा केली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. कॅशलेस पेमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत 45 जण लखपती झाले आहेत. NPCI च्या वेबसाईटवर यासंबंधीचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस दिली जाणार आहेत.
 
लकी ग्राहक योजना आणि दिगी धन योजना अंतर्गत 15 भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत, ज्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे. तसंच 614 विजेत्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय. 6500 विजेत्यांना प्रत्येक आठवड्याला 10 हजार रुपये देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर 15 हजार विजेत्यांना 1 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. ही बक्षीसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.
 
या लकी ड्रॉ मध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिलनाडू, उत्तरप्रद्रश आणि कर्नाटक या पाच राज्यातील विजेत्यांच प्रमाण जास्त आहे. 14 एप्रिलला सर्वात मोठं बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याचे एनसीपीआयच्य़ा अध्यक्षांनी सांगितलं आहे. ज्यात 1 कोटी, 50 लाख आणि 25 लाखांचं रोख बक्षीस देण्यात येईल.
 

Web Title: Cashless Lucky Draw - 45 Attacks Lakhpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.