महामार्गांवर आणणार कॅशलेस उपचार व्यवस्था

By admin | Published: July 26, 2015 11:49 PM2015-07-26T23:49:38+5:302015-07-26T23:49:38+5:30

देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित

Cashless treatment arrangements to be brought to the highways | महामार्गांवर आणणार कॅशलेस उपचार व्यवस्था

महामार्गांवर आणणार कॅशलेस उपचार व्यवस्था

Next

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक शहरे आणि महामार्गांवर रोखरहित(कॅशलेस)उपचार व्यवस्था लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी लवकरच रस्ते वाहतूक-रस्ते सुरक्षा विधेयक आणणार असल्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण निश्चित करतानाच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कृती योजना आणण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला. संसदेत सध्या सुरू असलेला गोंधळ आणि राजकारणावर त्यांनी भाष्य टाळले. गुडगाव, जयपूर, बडोदापासून तर मुंबई, रांची, रणगाव, मौंडिया महामार्गावर अपघातातील जखमींसाठी ही रोखरहित उपचार व्यवस्था आणली जात आहे, असे ते म्हणाले.
१५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी चांगला पाऊस पाहता चांगले पीक होण्याची शक्यता व्यक्त करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी स्वातंत्र्यदिनी काय बोलावे, याबाबत जनतेला सूचना मागितल्या. रक्षाबंधनानिमित्त शौचालयांची भेट देण्याबाबत घेण्यात आलेल्या पुढाकाराचा आणि इस्रोने ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ईशान्येकडील राज्यांच्या मुद्यालाही त्यांनी हात घातला.
ब्रदर नंबर वन!
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूने ब्रदर नंबर वन (भाई नंबर वन) योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी शौचालय भेट देणारा भाऊ सर्वोत्तम ठरतो. हे अधिकारी रक्षाबंधनाच्या पर्वावर हे काम करीत असून, त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थ कसा बदलला ते बघा. हरदा जिल्ह्याच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूला मी शुभेच्छा देतो. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील छोट्याशा केश्ला गावातील एकाही व्यक्तीला खुल्या जागेवर शौचाला जावे लागत नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Cashless treatment arrangements to be brought to the highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.