बिहारमधील जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध, सवर्ण, OBCसह इतरांची एवढी आहे लोकसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:24 PM2023-10-02T14:24:10+5:302023-10-02T14:24:36+5:30

Bihar Caste Census: बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे.

Caste wise census data in Bihar is famous, caste, caste wise, OBC and others have this population | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध, सवर्ण, OBCसह इतरांची एवढी आहे लोकसंख्या

बिहारमधील जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध, सवर्ण, OBCसह इतरांची एवढी आहे लोकसंख्या

googlenewsNext

बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार राज्यात राजपूत ३.४५% यादव १४%, भूमिहार २.८६%, ब्राह्मण ३.६५% आणि नौनिया १.९% एवढे आहेत. बिहारमधील जातिनिहाय जनगणनेनुसार राज्यात मागासवर्गीय (३ कोटी ५४ लाख ६३ हजार ९३६) २७.१२ टक्के, अतिमागास वर्गीय (४ कोटी ७० लाख, ८० हजार ५१४) ३६.०१ टक्के, अनुसूचित जाती (२ कोटी ५६ लाख ८९ हजार ८२०) १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती (२१ लाख, ९९ हजार ३६१) १.६८ टक्के आणि अनारक्षित (२ कोटी २ लाख ९१ हजार ६७९) १५.५२ टक्के आहेत.

जातिनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये हिंदू ८१.९९ टक्के, मुस्लिम १७.७० टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शिख ०.०११ टक्के, बौद्ध ०.०८५१ टक्के, जैन ०.००९६ टक्के आणि इतर धर्मीय ०.१२७४ टक्के आहेत. त्याशिवाय ०.००१६ टक्के लोकांचा कुठलाही धर्म नाही आहे. 

बिहारमधील जातिनिहाय जनगणनेच्या रिपोर्टनुसार ब्राह्मण ३.६५ टक्के, राजपूत ३.४५ टक्के, कायस्थ ०.६०११ टक्के, कुर्मी २.८७८५ टक्के, कुशवाहा ४.२१२० टक्के, तेली २.८२३१ आणि भूमिहार २.८६९३ टक्के आहेत.

बिहारमध्ये कुर्मी २,८७ टक्के, कुशवाहा ४.२७ टक्के, धानुक २.१३ टक्के, भूमिहार २,८९ टक्के, सोनार ०.६८ टक्के, कुंभार १.०४ टक्के, मुसहर ३.८ टक्के, बढई १.४५ टक्के, कायस्थ ०.६० टक्के, यादव १४.२६ टक्के आणि न्हावी १.५९ टक्के एवढे आहेत.  

Web Title: Caste wise census data in Bihar is famous, caste, caste wise, OBC and others have this population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.