धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या एक महिन्याच्या चिमुरड्याला मांजराने जंगलात नेले; ओरबडून केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:32 AM2023-07-18T10:32:05+5:302023-07-18T10:33:03+5:30
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्रा येथे एका दीड महिन्याच्या चिमुरड्याला जंगली मांजरीने चावा घेतल्याची घटना घडली समोर आली आहे. चिमुरडा घराच्या अंगणात आईच्या शेजारी एका खाटेवर झोपला होता. यावेळी मांजरीने मुलाला उचलले आणि जंगलात नेले. तेथे मांजरीने पंजाने वार केला यात त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना हा प्रकार कळेपर्यंत निष्पापाचा मृत्यू झाला होता. लोकांनी मांजराचा पाठलाग केला.
'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं
सुनील पिनाहाट ब्लॉकच्या पिधौरा भागातील बारपुरा गावात राहतात. त्यांनी दिलेली माहिती अशी, उष्णतेमुळे पत्नी संजना आपल्या १.२५ महिन्यांच्या चिमुकल्या आरवसोबत घराच्या अंगणात कॉटवर झोपल्या होत्या. रात्री उशिरा रानमांजर भिंतीवरून उडी मारून घरात शिरले आणि मुलाला तोंडात दाबून शेतात घेऊन गेले. पत्नीला याची जाणीव होऊ शकली नाही. जंगली मांजरीने मुलाला जंगलात नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.
दीड महिन्याचे बाळ आईजवळ चिकटून झोपले होते. रान मांजर तोंडात दाबून घेऊन गेली. शेतात मांजरीने मुलाला आपल्या पंजाने ओरबाडून हल्ला केला. मुलाच्या शोधात नातेवाईक शेतात पोहोचले असता त्यांना टॉर्चच्या प्रकाशात मांजर ओरबाडत असल्याचे दिसले.
दीड महिन्याच्या चिमुरड्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांना रडू कोसळले. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.