चोकसीला पकडा; भारताची अँटिग्वा सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:04 AM2018-07-31T01:04:48+5:302018-07-31T01:05:34+5:30

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याला देश सोडून जाऊ देऊ नका, अशी विनंती भारत सरकारने अँटिग्वा सरकारला केली आहे. तो सध्या अँटिग्वामध्ये असल्याची माहिती आहे.

 Catch choke; Request to the Antigua Government of India | चोकसीला पकडा; भारताची अँटिग्वा सरकारला विनंती

चोकसीला पकडा; भारताची अँटिग्वा सरकारला विनंती

googlenewsNext

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याला देश सोडून जाऊ देऊ नका, अशी विनंती भारत सरकारने अँटिग्वा सरकारला केली आहे. तो सध्या अँटिग्वामध्ये असल्याची माहिती आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चोकसी अँटिग्वामध्ये लपल्याची माहिती मिळताच तेथील भारतीय राजदूतांनी सरकारला दक्ष राहण्याची विनंती केली आहे. सक्षम भारतीय तपास व अन्य संस्था, अँटिग्वा व बारबुडा सरकार यांच्याशी परराष्ट्र मंत्रालय समन्वय साधून आहे. सीबीआयने अँटिग्वा सरकारला पत्र पाठवून त्याचा ठावठिकाणा कळविण्याची विनंती केली होती.
अँटिग्वा सरकारने अधिकृतरीत्या जारी केलेल्या माहितीनुसार, चोकसीने यंदाच्या जानेवारीमध्ये म्हणजेच पीएनबी घोटाळा उघडकीस येण्याच्या आधीच अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

Web Title:  Catch choke; Request to the Antigua Government of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.