पकडलेले ड्रग्ज पुन्हा बाजारात?
By admin | Published: February 20, 2017 01:17 AM2017-02-20T01:17:27+5:302017-02-20T01:17:27+5:30
देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो. सुरक्षा एजन्सींकडून पकडण्यात येणारे ड्रग्ज पुन्हा बाजारात तर येत नाहीत ना याबाबत एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.
कारवाई तुटपुंजी
03 वर्षात पकडण्यात आलेल्या १५०.५ किलो आणि ४३८६ कि लो हेरॉइनमध्ये १२५७ किलोच नष्ट करण्यात आले.
4.64 लाख कफ सिरपच्या बाटल्या पकडण्यात आल्या. पण, यातील केवळ २७,३०० बाटल्या नष्ट करण्यात आल्या.
2.27 कोटी गोळ्यांपैकी ४५.३५ लाख गोळ्या नष्ट करण्यात आल्या.
पुन्हा बाजारात येऊ नयेत
गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या प्रकरणातील ड्रग्ज ताबडतोब नष्ट केले जावेत. जेणेकरुन ते पुन्हा बाजारात येणार नाहीत. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी याबाबत सहा महिन्यांच्या आत यंत्रणा उभी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
लाखो किलो ड्रग्ज पडून
या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने जप्त ड्रग्जबाबत विचारणा केली होती की, महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे गत दहा वर्षात १.१४ लाख किलो गांजा, ४२६ कि लो हेरॉइन, १८९३ कि लोपेक्षा जास्त चरस, ५६६ कि लो ओपियम आणि ११ किलो कोकेन जप्त केले आहे. देशातही केवळ १६ टक्के नष्ट करण्यात आले आहे.
नियमांचे पालन
ड्रग्ज जप्ती आणि नष्ट करण्यात मोठे अंतर असले तरी, सरकारने अलिकडेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांना नष्ट करण्याबाबत सरकार नियमांचे पालन करत आहे.
माफियांशी मिलीभगत
न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्याकडे ताकद अणि मजबूत नेटवर्क आहे. याामुळे धोका आणखी वाढत आहे. कारण, पोलीस आणि सत्तेतील नेते त्यांची मदत करत आहेत.
केवळ गांजा आणि इफेड्रीनच नाही तर सर्व अमली पदार्थांच्या जप्तीत आणि नष्ट करण्यात मोठे अंतर आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीत हे अंतर काही वर्षांपासून दिसून येत आहे.