संपुआनेही दिले होते प्रेमप्रकरणाचे कारण
By admin | Published: July 25, 2015 11:26 PM2015-07-25T23:26:10+5:302015-07-25T23:26:10+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणांमध्ये प्रेमप्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री
Next
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणांमध्ये प्रेमप्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाठराखण केली.
यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात या मुद्यावर देण्यात आलेल्या उत्तरात शेतकरी आत्महत्येमागील विविध कारणांमध्ये प्रेमप्रकरणाचाही उल्लेख होता, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरणांसह हुंडा, निष्क्रियता आणि व्यसनाधीनता यासारखी वैयक्तिक कारणेही असल्याचे राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगताच विरोधकांच्या संतापाचा भडका उडाला होता.